जत (वार्ताहर): - जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती भयावह बनल्याने त्याच्या पाहणीकरिता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह 15 मंत्र्यांचा दौरा रविवारी (ता. 1 एप्रिल) दुपारी दोन वाजता आयोजित केला असल्याची माहिती जत पंचायत समितीचे माजी सभापती मन्सूर खतीब यांनी दिली.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीची झालेली कामे, दुष्काळामुळे द्राक्ष, डाळींबासह ज्वारी, बाजरी, मका आदी पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी, म्हैसाळ 6 व्या टप्प्याचे काम, पाणीटंचाईची परिस्थिती, जनावरांची स्थिती आदीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री जत तालुक्यातील डफळापूर, गुड्डापूर, माडग्याळ या भागांमधील गावांना भेटी देणार आहेत. त्यांच्यासमोबत पालकमंत्री पतंगराव कदम, केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, गृहमंत्री आर. आर. पाटील, अर्थमंत्री अजित पवार, महसूलमंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री लक्ष्मणराव ढोबळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, माजी पणनमंत्री मदन पाटील आदींसह सर्व खात्यांचे सचिव या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा